Episodes

  • ड्रॅगन फ्रुट शेतीत खरंच पैसा आहे का? 💰🤔 with Mahesh Asabe | Maativerse | Indian Farmer Santosh
    Apr 21 2026

    आजकाल अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळताना दिसत आहेत. सोशल मीडियावर लाखोंच्या कमाईच्या गोष्टी ऐकायला मिळतात. पण खरंच ही शेती इतकी फायदेशीर आहे का? की यात काही hidden challenges सुद्धा आहेत?या सगळ्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही संवाद साधला प्रोग्रेसिव्ह शेतकरी Mahesh Asabe यांच्याशी. ड्रॅगन फ्रूट शेतीची सुरुवात कशी करावी? सुरुवातीचा खर्च आणि अपेक्षित गुंतवणूक किती असायला हवी? कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? मार्केटिंग आणि विक्री कशी करावी? आपल्या भागात ही शेती चालेल का? ड्रॅगन फ्रूट शेती हा फक्त ट्रेंड आहे की खरंच एक मोठी संधी आहे, याच सगळ्या प्रश्नांचा ground reality check या एपिसोडमध्ये तुम्हाला मिळेल.जर तुम्ही नवीन पिकाचा विचार करत असाल, किंवा ड्रॅगन फ्रूट शेतीबद्दल कन्फ्यूज असाल, तर हा एपिसोड तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. त्यामुळे हा एपिसोड skip न करता शेवटपर्यंत पाहा, like, share आणि comment करायला विसरू नका.

    Show more Show less
    1 hr and 28 mins
  • Quality Seeds कसे ओळखायचे With Kishor Gaikwad 🌱| Maativerse | Indian Farmer Santosh
    Mar 31 2026

    बियाण्यांबद्दल A to Z माहिती, योग्य बियाणं कसं ओळखायचं, त्याची निवड कशी करायची आणि बियाणं जपणं का महत्त्वाचं आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉ. किशोर गायकवाड, ज्यांना या क्षेत्रात मोठा अनुभव आहे. ते Sakata Seeds Pvt. Ltd. मध्ये कार्यरत असून बियाण्यांबाबत त्यांना सखोल ज्ञान आहे. या पॉडकास्टमध्ये आपण तुम्हाला पडणाऱ्या अनेक उत्तरं प्रश्नांची जाणून घेणार आहोत. Quality Seeds कसं ओळखायचं?, बियाणं निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, Seed Conservation का आणि कसं करायचं?, शेतकऱ्यांच्या सामान्य चुका आणि त्यावर उपाय हे सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहा.

    👉पॉडकास्ट आवडला तर Like करा, Channel Subscribe करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत जरूर शेअर करा.

    Show more Show less
    1 hr and 33 mins
  • टोमॅटो शेतीचं खरं गणित with Ajit Gholap 🍅🚜 | Maativerse | Indian Farmer Santosh
    Mar 24 2026

    प्रगतशील शेतकरी अजित घोलप यांनी टोमॅटो शेतीत उल्लेखनीय यश मिळवलं आहे. अजित घोलप सरांनी टोमॅटो शेतीतील त्यांचा अनुभव, आव्हाने आणि यशाचा प्रवास सविस्तरपणे शेअर केला आहे. या चर्चेत आपण जाणून घेणार आहोत, टोमॅटो शेतीचं खरं गणित आणि Ground Reality, कमी खर्चात आणि योग्य व्यवस्थापनाने नफा कसा वाढवायचा, टोमॅटो शेतीतील सामान्य चुका आणि त्यावर उपाय, मार्केट, भाव आणि शेतीतील सध्याच्या संधी. जर तुम्हाला टोमॅटो शेतीत यशस्वी व्हायचं असेल किंवा शेतीत काहीतरी नवीन शिकायचं असेल, तर हा एपिसोड नक्की पाहा. व्हिडिओ आवडला तर Like करा, Channel Subscribe करा आणि हा पॉडकास्ट इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.

    Show more Show less
    1 hr and 28 mins
  • संघर्षातून Export पर्यंत पोहोचलेली द्राक्ष बाग 🍇🌍| Ft.Ganesh M.| Maativerse | Indian Farmer Santosh
    Mar 17 2026

    गणेश मोरे उर्फ बबलू दादा, हे एक यशस्वी द्राक्ष उत्पादक (Grape Farmer) असून Agzotic Farm या नावाने द्राक्ष शेती आणि Export Business यशस्वीपणे चालवत आहेत. द्राक्ष शेतीत शिस्त, व्यवस्थापन आणि योग्य नियोजन ठेवून त्यांनी Local Market पासून Global Market पर्यंतचा प्रवास कसा केला, द्राक्ष शेतीची Ground Reality, द्राक्ष शेतीतील अडचणी, आव्हाने आणि संधी, शेतकऱ्यांनी द्राक्ष शेतीत यशस्वी होण्यासाठी काय करावं याविषयी या पॉडकास्ट मध्ये सविस्तर चर्चा केली आहे. जर तुम्हाला द्राक्ष शेती, Export Market आणि आधुनिक शेती याबद्दल माहिती हवी असेल, तर हा एपिसोड नक्की पाहा आणि पॉडकास्ट आवडला तर Like करा, कमेंट करा, Channel ला Subscribe करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.

    Show more Show less
    1 hr and 28 mins
  • AI मुळे शेतकऱ्यांची मेहनत कमी होणार का? 🤖| Ft. Gaurav Somwanshi | Maativerse | Indian Farmer Santosh
    Mar 10 2026

    आजच्या काळात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे आणि त्याचा परिणाम शेती क्षेत्रावरही दिसून येत आहे. AI मुळे पिकांचे रोग ओळखणे, हवामानाचा अंदाज घेणे, उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी करणे यासारख्या अनेक गोष्टी शक्य होत आहेत. या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी गौरव सोमवंशी, Founder of EmerTech Innovations, ज्यांना AI आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा अनुभव आहे. त्यांनी AI चा वापर शेतीमध्ये कसा करता येतो, भविष्यात शेती कशी बदलू शकते आणि शेतकऱ्यांना याचा नेमका कसा फायदा होऊ शकतो याबद्दल या पॉडकास्टमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. जर तुम्हाला भविष्यातील स्मार्ट शेती, AI तंत्रज्ञान आणि शेतीत होणारे बदल समजून घ्यायचे असतील तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पाहा आणि जास्तीत जास्त शेअर करा.

    Show more Show less
    1 hr and 7 mins
  • 32 वर्षांच्या शाश्वत शेतीचं रहस्य with Ganesh Nanote 🌾🔥| Maativerse | Indian Farmer Santosh
    Mar 3 2026

    ३५ वर्षांचा अनुभव, शाश्वत शेतीचा अभ्यास आणि सातत्याने प्रयोग करून यश मिळवलेले प्रगतिशील शेतकरी गणेश नानोटे यांच्याकडून जाणून घेऊया शाश्वत शेती म्हणजे नेमकं काय? गेल्या ३५ वर्षांत त्यांनी एकदाही शेणखत न टाकता शेती कशी केली? संतुलित शेतीकडे वळताना कोणती आव्हानं आली? खर्च कमी करत उत्पादन कसं वाढवता येतं? आणि पुढील पिढीसाठी टिकाऊ शेतीचा मार्ग कोणता? गणेश ननोटे सरांनी प्रत्यक्ष शेतात केलेले प्रयोग, घेतलेले निर्णय आणि आलेले अनुभव हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी मार्गदर्शक ठरतील. जर तुम्हाला शेती व्यवसाय म्हणून करायची असेल, खर्च कमी करून नफा वाढवायचा असेल, तर मातीव्हर्सचा हा एपिसोड नक्की पाहा.

    Show more Show less
    1 hr and 11 mins
  • Agro-Tourism प्रत्येक शेतकऱ्यासाठी आहे का? | Ft. Manoj Hadwale | Maativerse | Indian Farmer Santosh
    Feb 24 2026

    Maativerse च्या या भागात आम्ही संवाद साधला आहे Manoj Hadwaleयांच्याशी जे Parashar Agro Tourism आणि Hachiko Tourism चे संस्थापक असून Agro-Tourism क्षेत्रातील एक अनुभवी आणि जाणकार तज्ज्ञ आहेत.या पॉडकास्टमध्ये Agro-Tourism म्हणजे नेमकं काय, ते प्रत्यक्षात कसं काम करतं, शेतकऱ्यांनी Agro-Tourism सुरू करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून Agro-Tourism कसं यशस्वी करता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, ग्रामीण उद्योजक असाल किंवा शेतीला जोड व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा.

    Show more Show less
    1 hr and 19 mins
  • Natural vs Organic शेती: गोंधळ, सत्य आणि अनुभव | Ft. Rajendra B | Maativerse | Indian Farmer Santosh
    Feb 10 2026

    आजकाल अनेक लोक Natural शेती आणि Organic शेती एकच आहे असं समजतात. पण प्रत्यक्षात हा गोंधळ कुठे होतो? दोन्ही पद्धतींमधला खरा फरक काय आहे? आणि शेतकऱ्यांसाठी कोणती शेती योग्य ठरते? आजच्या घडीला Sustainable Farming करणं शक्य आहे का? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या Nisargmitra Farm चे संस्थापक Rajnedra Bhat सर यांच्याकडून. हा Podcast शेतकरी, शेतीत रस असलेले युवक, आणि नैसर्गिक शेती शिकू इच्छिणाऱ्यांसाठी नक्कीच उपयोगी आहे. त्यामुळे Video शेवटपर्यंत नक्की पाहा, कारण हा पॉडकास्ट फक्त theory नाही तर ground reality दाखवणारा आहे.

    Show more Show less
    1 hr and 48 mins